नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आजची पहिली मराठी स्पेशल टेस्ट देत आहे.
टॉपिक आहे, " नाम ".
सर्वांनी टेस्ट OMR Sheet वरती सोडवायची आहे. किंवा पेज वरती 1 ते 20 क्रमांक टाकून सॉल करा.
१) खालीलपैकी सामान्य नाम ओळखा?
A) खडू
B) पांढरा खडू
C) औरंगाबाद
D) शरद
२) मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार आहेत?
A)२
B)४
C)३
D)५
३) खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणती?
A) राग
B) कळक
C) तूप
D) मोती
४) विशेष नाम हे असते?
A) दोन वचनी
B) बहुवचनी
C) अनेक वचनी
D) एक वचनी
५) समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला .. नाम म्हणतात?
A) विशेष नाम
B) पदार्थ वाचक
C) समूहवाचक
D) सामान्य नाम
६) पाणी हे नाम आहे?
A) समूहवाचक
B) विशेष नाम
C) पदार्थवाचक
D) सामान्य नाम
७)..... हे नाम वस्तू स्वरुपात दाखवता येत नाहीत?
A) विशेष नाम
B) भाववाचक नाम
C) समूहवाचक नाम
D) सामान्य नाम
८) सामान्य नामाचे प्रकार पडतात?
A)३
B)४
C)५
D)२
९) भाववाचक नामाचे किती गट पडतात?
A)३
B)४
C)५
D)६
१०) भाववाचक नामाची स्थितीदर्शक गुण दर्शक व कृती दर्शक हे तीन गट पडतात हे विधान खरे आहे?
A) चूक
B) बरोबर
C) साधी द
D) यापैकी नाही
११) श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यातील नाम ओळखा?
A) गर्व
B) असतो
C) श्रीमंत
D) यापैकी नाही
१२) धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामा सारखा उपयोग केल्यास त्याला असे नाम म्हणतात?
A) समूहवाचक
B) अव्यय साधित
C) धातुसाधित
D) विशेषण साधित
१३) पुढील वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. सुधा सामना जिंकली?
A) सामान्य नाम
B) पदार्थ वाचक
C) समूहवाचक
D) विशेष नाम
१४) त्याच्या प्रत्येक वाक्यात आणि चा वापर असतो या वाक्यातील नामाच्या प्रकार ओळखा?
A) अव्यय साधित
B) धातुसाधित
C) नाम साधित
D) विशेषण साधित
१५) हुशारी या नामाचा प्रकार ओळखा?
A) भाववाचक
B) समूहवाचक
C) विशेष
D) सामान्य
१६) ताजमहल या नामाचा प्रकार कोणता?
A) सामान्य
B) विशेष नाम
C) भाववाचक
D) समूहवाचक
१७) गरीबी हा कोणत्या भाववाचक नामाचे प्रकार आहे?
A) कृती दर्शक
B) गुणदर्शन
C) सिटी दर्शक
D) यापैकी नाही
१८) खालीलपैकी गुणदर्शक भाववाचक नामाचे उदाहरण कोणते?
A) स्वातंत्र्य
B) चोरी
C) चळवळ
D) प्रामाणिकपणा
१९) ढिगारा हे या नामाचे उदाहरण आहे?
A) समूहवाचक
B) पदार्थ वाचक
C) भाववाचक
D) विशेष नाम
२०) खालीलपैकी विशेष नाम ओळखा?
A) कुत्रा
B) मुंबई
C) राग
D) साखर
उत्तर सूची:-
१)A
२)C.
३)C
४)D
५)C
६)C
७)B
८)D
९)A
१०)B
११)C
१२)C.
१३)D
१४)A.
१५)A
१६)B
१७)C
१८)D
१९)A
२०)B
0 टिप्पण्या